पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते सन्मान सोहळ्यात विविध संस्थामधील ७४५ आदर्श शिक्षकांचा सन्मान
पुणे : भारतीय जनता पक्ष, पुणे शहर, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी आणि पुणे विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या सभागृहात भव्य ‘शिक्षक सन्मान’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते सन्मान सोहळ्यात विविध संस्थामधील ७४५ आदर्श शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी चंद्रकांत पाटील यांनी सर्व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या तसेच शिक्षक हे ज्ञान दानाचे पवित्र कार्य करुन भावी पिढी आणि देशाचे उज्ज्वल भविष्य घडविण्याचे कार्य करत असतात. संस्कारांच्या माध्यमातून समाजात सुजाण नागरिक घडविणाऱ्या शिक्षकांचे सर्व विषय मार्गी लावू असे आश्वस्त देखील केले.
पुण्याचे डीसीपी संदीप सिंह गील हे IPS होण्याआधी प्राध्यापक म्हणून कार्यरत होते, त्यांचा हि विशेष सन्मान यावेळी करण्यात आला. या कार्यक्रमाचे संयोजक म्हणून पुणे विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. जगदीश मुळीक व सहसंयोजक म्हणून भाजप युवा मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष निवेदिता एकबोटे यांनी जबाबदारी पार पाडली.
यावेळी आमदार माधुरी ताई मिसाळ, भाजपचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रा.डाॅ. गजानन एकबोटे, शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष ॲड. सोहनलाल जैन, महाराष्ट्र गोसेवा आयोगचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांच्यासह पक्षातील सहकारी पदाधिकारी आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.