पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले सार्वजनिक गणपती मंडळासह पुण्यातील मानाच्या पाच गणपतींचे दर्शन
पुणे: गणेशोत्सव संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहात साजरा होत आहे. पुण्यात देखील गणेश मंडळे आणि भक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.
काल पुण्याची पालकमंत्री आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील सार्वजनिक गणेश मंडळांसह
पुण्यातील मानाचा पहिला कसबा गणपती, मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी, मानाचा चौथा तुळशीबाग गणपती, मानचा पाचवा केसरी वाडा आणि अखिल मंडई गणेशोत्सव मंडळाच्या शारदागणेशाचे दर्शन घेऊन मनोभावे पूजा केली.
यावेळी पाटील यांनी सर्वांना उत्तम आरोग्याससह सुख, समृद्धी आणि समाधान लाभो हीच बाप्पा चरणी प्रार्थना केली.
पाटील यांच्या समवेत पुणे शहर भाजपचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.