Latest Marathi News

BREAKING NEWS

गौतमी पाटीलला जिल्हा बंदी करा, तिच्यावर गुन्हा दाखल करा

0

डान्सर गौतमी पाटील हे नाव आता संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. गौतमी पाटील जितकी तिच्या नृत्यामुळे प्रसिध्द नाही तितकी ती तिच्या अश्लील नृत्यामुळे प्रसिद्ध आहे. अशातच नाशिकमध्ये घडलेल्या घटनेमुळे आता थेट जिल्हा बंदीची मागणी केली जात आहे.

नाशिक येथे गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना तेथील उपस्थित मद्यपी तरुणांनी मारहाण केली. या घटनेत पत्रकार गंभीर जखमी झाले आहे. या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करत असून गौतमी पाटीलवर गुन्हा दाखल करून तिला नाशिक जिल्हा बंदी करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी केली आहे.

तसेच घडलेल्या या संपूर्ण घटनेसाठी सर्वस्वी गौतमी पाटीलला जबाबदार धरून तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच नाशिकमध्ये असे प्रकार पुन्हा घडू नये यासाठी नाशिक जिल्ह्यात गौतमी पाटीलला पूर्णतः बंदी घालण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी केली आहे.

प्रकरण असे की, नाशिकमध्ये नर्तकी गौतमी पाटीलचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात हुल्लडबाजांनी एकच गोंधळ घालत मीडियावर हल्ला केला. या मारहाणीत अनेक फोटोग्राफर आणि कॅमेरामन जखमी झाले आहेत. यापूर्वी सुद्धा गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमांमध्ये राडा झाल्याचे दिसून आले होते तसेच वेळोवेळी पोलिसांना सुद्धा पाचारण करावे लागले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.