मध्य प्रदेशातील उज्जैनचे खासदार अनिल फिरोजिया यांनी आपल्या मतदारसंघातील विकासासाठी तब्बल ३२ किलो वजन कमी केले आहे. प्रति किलो वजन कमी केल्यास आपण विकास कामांसाठी 1000 कोटी रुपये जेऊ, असे चॅलेन्ज केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांना दिली होते.
यासंदर्भात बोलताना अनिल फिरोजिया म्हणाले, “मी चॅलेन्ज स्वीकारले आणि जवळपास 32 किलोपर्यंत वजन कमी केले.” याच वर्षी जून महिन्यात केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांना व्यासपीठावरून फिरोजिया यांनी कमी केलेल्या प्रत्येक किलो वजनावर आपण विकास कामांसाठी 1000 कोटी रुपये देऊ, असे आश्वासन दिले होते.
एएनआय या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना फिरोजिया म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फिट इंडिया मोहिमेची सुरूवात केली होती. तेव्हा वजन कमी केल्यास मला उज्जेनच्या विकासासाठी प्रति किलो मागे 1000 कोटी रुपये मिळतील, असे नितीन गडकरी यांनी म्हटले होते. हे मी आव्हान म्हणून स्वीकारले आणि 32 किलो वजन कमी केले.
आता मी आणखी वजन कमी करणार आणि त्यांना दिलेल्या आश्वासनाप्रमाणे आणखी निधी देण्यास सांगणार.” एढेच नाही, तर “मी वजन कमी केल्यास उज्जैनला अधिक बजेट मिळत असेल, तर मी त्यासाठी फिटनेसवर अधिक लक्ष देण्यास तयार आहे,” असेही फिरोजिया म्हणाले.