Latest Marathi News

BREAKING NEWS

गदर २ ने मोडला बाहुबलीचा रेकॉर्ड; तब्बल इतक्या कोटीची केली कमाई

0

संपूर्ण भारतीय नागरिकांना पुन्हा एकदा सनी पाजीच्या डायलॉगने अक्षरश: वेड लावलं आहे. तारा सिंग आणि सकिनाच्या अनोख्या लव्हस्टोरीचा एक नवीन टप्पा ‘गदर 2’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तब्बल 22 वर्षांनंतर पुन्हा एकदा थिएटरमध्ये तीच क्रेझ पहायला मिळतेय. 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या ‘गदर 2’ या चित्रपटाने स्वातंत्र्यदिनी रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे.

हा चित्रपट स्वातंत्र्यदिनी सर्वांत जास्त कमाई करणारा आणि सर्वांत जास्त पाहिला गेलेला भारतीय चित्रपट ठरला आहे. पाचव्या दिवशी या चित्रपटाचे शोज हाऊसफुल होत आहे. तसेच अनेक चित्रपट गृहात हाऊस फुलाचे बोर्ड लागल्याचे चित्र दिसून येत आहे. ‘गदर 2’ने प्रदर्शनाच्या पाचव्या दिवशी आतापर्यंत सर्वाधिक कमाई केली असून या चित्रपटाने ५५.५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. आतापर्यंत या चित्रपटाने जगभरात तब्बल २३० कोटी केला आहे

कमाईच्या या दमदार आकड्यांसह सनी देओल आणि अमीषा पटेल यांच्या ‘गदर 2’ने प्रभासच्या बाहुबली 2, सलमान खानच्या सुलतान आणि हृतिक रोशनच्या वॉर या चित्रपटांनाही मागे टाकलं आहे. पाचव्या दिवशी बॉलिवूडमध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये ‘गदर 2’ हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. याआधी शाहरुख खानच्या ‘पठाण’ने ५८.५ कोटी रुपयांची कमाई केली होती.

मुख्यमंत्र्यांना मृत रुग्णांच्या दुर्दैवी नातेवाईकांचे अश्रूही पुसता आले असते परंतु.. !

मुंबई-गोवा हायवे-च्या मुद्द्यावरून राजकारण तापणार; राज ठाकरे यांच्या निर्धार मेळाव्याकडे राज्याचं लक्ष

Leave A Reply

Your email address will not be published.