बीड : अजित पवार गटाचे नेते मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी अधिक वाढणार आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी थेट परळीत जाहीर सभा आयोजित केली असून या सभेत धनंजय मुंडे विरोधात उमेदवार उभा करायला हालचाली सुरू केल्या आहेत. परळीच्या पंचायत समितीचे माजी सभापतीसह बीआरएसच्या अनेक नेत्यांचा बीडमध्ये उद्या होणाऱ्या जाहीर सभेत प्रवेश होणार असल्याचं निश्चित झालंय. विशेष म्हणजे शरद पवार यांच्यासोबत शिवराज बांगर यांच्यासह बबन गीते यांची बैठक झाल्याचे देखील समोर आलं आहे.
परळी मतदारसंघासह राज्यातील अनेक भागांमध्ये जनक्रांती संघटनेच्या माध्यमातून सामाजिक आणि राजकीय काम करणारे पंचायत समितीचे माजी सभापती बबन गीते यांच्यासह बीआरएस पक्षाचे नेते शिवराज बांगर हे शरद पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. विशेष म्हणजे यादरम्यान शेकडो कार्यकर्ते देखील राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत
राष्ट्रवादीचे नेते बबन गीते यांचं परळी मतदारसंघात चांगलंच वर्चस्व आहे. यामुळे धनंजय मुंडे यांना पर्याय म्हणून शरद पवार हे बबन गीते यांना ताकद देणार असल्याची माहिती आहे. तर धनंजय मुंडे यांच्यामुळेच माझ्यावर खोटा गुन्हा दाखल झाला आणि मला जेलमध्ये घातलं. असा अनेकवेळा गंभीर आरोप करणारे बीआरएसचे नेते शिवराज बांगर यांना देखील शरद पवार हे ताकद देणार असल्याची माहिती समोर आली आहे. आता पवारांच्या या खेळीमुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढणार आहे.
मुख्यमंत्र्यांना मृत रुग्णांच्या दुर्दैवी नातेवाईकांचे अश्रूही पुसता आले असते परंतु.. !