Latest Marathi News

BREAKING NEWS

दिल्ली महापालिकेत ‘आप’ची सत्ता; भाजप, काँग्रेसला मागे टाकत विजयी

0

दिल्ली महानगरपालिकेत आम आदमी पक्षाने सत्ता मिळवली आहे . महापालिकेत आम आदमी पक्षाचा झाडू चालला असून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाने भाजप आणि काँग्रेसला मागे टाकले आहे. एकंदरीत पाहता आम आदमी पक्षाने १३४ जागांवर आपले वर्चस्व स्थापन केले. तर भाजप १०३ आणि काँग्रेसला १० जागांवर समाधान मानावे लागले. यासोबतच दिल्ली महापालिकेवरील भाजपची दीड दशकाची सत्ता संपुष्टात येणार आहे.

या निवडणुकीत मुख्य लढत आप, भाजप आणि काँग्रेसमध्येच होती. दिल्ली महापालिकेच्या २५० जागांसाठी ४ डिसेंबर रोजी मतदान झाले होते. तर आज (७ डिसेंबर) मतमोजणी झाली. या निवडणुकीत २५० जागांसाठी एकूण १३४९ उमेदवार मैदानात होते. भाजपने एमसीडी निवडणुकीत चार पसमांदा मुस्लिमांना उमेदवारी दिली होती. यामध्ये तीन महिला होत्या. पसमांदा मुस्लिम हे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय दृष्टीने सर्वांत मागासलेले समजले जातात.

तसेच यामध्ये अन्सारी, कुरेशी, मन्सुरी, सिद्दीकी अशा ४१ जातींचा समावेश आहे. दिल्ली महापालिका निवडणुकीत भाजपचा एकही मुस्लिम उमेदवार विजयी झाला नाही.दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत बहुमत मिळाल्यानंतर आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करण्यास सुरुवात केली. दिल्लीमध्ये आपच्या कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमले आहे. तर मुंबईसह ठिकठिकाणी आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते जल्लोष साजरा करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.