Latest Marathi News

BREAKING NEWS

बनावट इंस्टाग्राम अकाउंटवरून प्रेमाची भुरळ घालून लाखो रुपयांची फसवणूक

0

कोल्हापूर |

इन्स्टाग्राम अकाउंटच्या माध्यमातून तरुणाला प्रेमाची भुरळ घालून आर्थिक फसवणूक करणाऱ्या एका महिलेसह करवीर तालुक्यातील कोपार्डे येथील चौघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतलंय. त्यांच्याकडून पोलिसांनी एक लाख बारा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय.

जठारवाडी येथील एका युवकाला शुभांगी नावाच्या फेक इंस्टाग्राम अकाउंटवरून ओळख करून प्रेमाची भुरळ घालून पाडळी खुर्द परिसरात २५ जून ला भेटायला बोलवलं. या ठिकाणी मित्रांच्या सहकार्याने त्याला मारहाण करून मोबाईल आणि रोकड काढून घेतली होती. या प्रकरणी त्याने दिलेल्या फिर्यादीवरून करवीर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तांत्रिकदृष्ट्या अत्यंत हुशारीने तपास करत पन्हाळा तालुक्यातील आकुर्डे येथील कोमल पाटील हिच्यासह कोपार्डे येथील चौघा तरुणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतलंय. नितीन पाटील, मोहसीन मुल्ला, करण रेनुसे, इंद्रजित पाटील अशी त्या चौघांची नावे आहेत.

ही कारवाई पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, अंमलदार सागर चौगले, प्रीतम मिठारी, रणजित कांबळे, रफिक आवळकर, सुप्रिया कात्रट यांनी मिळून केलीय.

Leave A Reply

Your email address will not be published.