Latest Marathi News

BREAKING NEWS

फडणवीसांच्या ड्रायव्हिंगबाबत मोदींनीही मला विचारलं, म्हणाले…;

0

नागपूर समृद्धी महामार्गाचं लोकार्पण उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे.याआधी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महामार्गाची चाचणी घेतली. समृद्धी महामार्गावरील टेस्ट ड्राइव्ह कशी होती याचा अनुभव शेअर करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमच्या टेस्ट ड्राइव्हची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही घेतल्याचं सांगितलं. फडणवीस-शिंदेंनी टेस्ट ड्राइव्ह केल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे दिल्ली दौऱ्यावर गेले होते. यात पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. मोदींनी यावेळी आपल्याला समृद्धी महामार्गावरील टेस्ट ड्राइव्हचा अनुभव विचारल्याचं शिंदेंनी सांगितलं.

एका प्रसिद्ध माध्यमामध्ये दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री शिंदे यांनी पंतप्रधान मोदींसोबतच्या भेटीतील किस्सा सांगितला. समृद्धी महार्गावरील टेस्ट ड्राइव्हवेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हाती स्टेअरिंग होतं. मग फडणवीसांसोबतच्या ड्राइव्हचा अनुभव कसा होता? याबाबत बोलताना एकनाथ शिंदेंनी फडणवीसांच्या ड्रायव्हिंगचं कौतुक केलं. तसंच सुरुवातीला थोडी भीती वाटली होती. पण ते पट्टीचे ड्र्रायव्हर निघाले असं सांगितलं.

“समृद्धी महामार्गावर याआधी मी ड्रायव्हिंग केलं आहे. त्यामुळे त्या दिवशी फडणवीसांच्या ड्रायव्हिंगचा मूड होता. तेच म्हणाले मी चालवतो तुम्ही बाजूला बसा. आता ड्रायव्हिंग न येणारा बाजूला बसला असेल तर त्याला भीती अजिबात नसते. पण मला ड्रायव्हिंग येत असल्यामुळे थोडी भीती वाटली होती. कारण धाकधूक मनात असते. पण फडणवीसांनी कमाल ड्रायव्हिंग केलं. ते तर पट्टीचे ड्रायव्हर निघाले”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.