Latest Marathi News

BREAKING NEWS

फोडाफोडीचं आणि खोक्यांचं राजकारण लोकांनी नाकारलं, पवारांचा भाजपाला टोला

0

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपाचा जोरदार पराभव झाला असून यावर आता राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत अशातच आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देशात चुकीचे वातावरण निर्माण करणाऱ्या प्रवृत्तींना कर्नाटकमधील जनतेने धडा शिकवला. त्यासाठी कर्नाटकमधील जनता आणि बहुमत मिळवणाऱ्या काँग्रेस पक्षाचे अभिनंदन. आता ही प्रक्रिया संबंध देशात होईल.

आज केरळ, तामिळनाडू,कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश, राजस्थान, दिल्ली, झारखंड, पंजाब, पश्चिम बंगाल अशा बहुसंख्य राज्यात भाजप सत्तेबाहेर जात आहे. २०२४ मध्ये लोकसभा निवडणुका होतील तेव्हा देशात काय चित्रं असू शकते, याचा अंदाज कर्नाटकच्या निकालांनी येऊ शकतो, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी जाहीर झाला. यामध्ये काँग्रेसने १३४ जागांवर निर्णायक आघाडी घेत भाजपला धूळ चारली. भाजपच्या वाट्याला अवघ्या ६४ जागा येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत भाष्य केले.

अलीकडच्या काळात केंद्र सरकारकडून विशेषत: भाजपकडून जिथे त्यांचं राज्य नाही, तिथे आमदार फोडून सत्ता बळकावली जाते. त्यासाठी सत्तेचा वापर करणं हे सूत्र रुढ झाले आहे. यापूर्वी कर्नाटकमध्येही केंद्र सरकारने तीच अवस्था केली, पहिलं सरकार होतं, तेथे लोक फोडून सरकार घालवले. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांनीही तेचे केले. मध्यप्रदेशातही आमदार फोडून कमलनाथ यांचे सरकार पाडण्यात आले. गोव्यातही भाजपने तेच केले. यंत्रणा आणि साधनसंपत्ती वापरुन सरकार पाडण्याची ही एक नवीन पद्धत सुरु झाली आहे, ही गोष्ट चिंताजनक आहे. मात्र, फोडाफोडी आणि खोक्यांचे राजकारण लोकांना पसंत नाही, ही गोष्ट कर्नाटकच्या निकालांनी दाखवून दिली, याकडे शरद पवार यांनी लक्ष वेधले.

Leave A Reply

Your email address will not be published.