कर्नाटक निवडणुकीचा निकाल लागला. काँग्रेसला विजय मिळाला. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. यासंदर्भात बोलताना काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले म्हणाले, राहुल गांधी यांनी साडेतीन हजार किलोमीटर चालून दाखवलं. लोकांना गळ्याला लावलं. लोकांचे दुःख समजून घेतले. लोकसभेत त्यांनी आपले विचार मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यात त्यांचे सदस्यत्व रद्द झालं. कर्नाटकचा निकाल हा त्याचा परिणाम आहे, असं मी म्हणणार नाही. हजारो कोटी रुपये खर्च करून भाजपने काँग्रेस नेतृत्वाला बदनाम करण्याचं पाप केलं होतं. त्याला परीक्षेला पुढं जावं लागलं. जनतेने ते आता मान्य केलं. राहुल गांधी हेच या देशाचे खरे नेतृत्व करू शकतात.
देशाच्या सत्तेमध्ये अनपड व्यवस्था बसलेली आहे. ते देश विकून देश चालवू शकतात. देशाला पुढं नेऊ शकत नाही. हे आता लोकांना कळलेलं आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करण्याचे कामाला कर्नाटकमधून सुरुवात झाली आहे, असंही नाना पटोले यांनी म्हंटलं.
वारकरी ही साधीभोळी लोकं आहेत. हजारो वर्षांची परंपरा त्यांनी जोपासली आहे. कारण त्यांना शांती पाहिजे. न्यायापासून मुक्त राहिलो पाहिजे. सगळ्या जाती-धर्माची लोकं एकत्रित राहिली पाहिजेत. असं सामान्य लोकांना वाटतं. काँग्रेसची भूमिका ही अशा सामान्य लोकांबरोबर आहे. पण, काही लोकं विध्वंश निर्माण करतात. त्यांच्या पाठीशी बजरंग बली नसतो. भगवान श्री राम आणि बजरंग बली आता काँग्रेससोबत आहेत, असंही नाना पटोले म्हणाले