Latest Marathi News

BREAKING NEWS

सगळ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल…पुण्यातील पूर परिस्थितीवर चंद्रकांत पाटील यांनी साधला पत्रकारांशी संवाद

0

पुणे : पुण्यात गुरुवारी पावसाने हाहाकार माजवला. अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली. याबाबत आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.  पाटील म्हणाले, एका दिवसात जास्त प्रमाणात पाऊस पडला. हा असाधारण पाऊस आहे जो धरण क्षेत्रात जास्त प्रमाणात पडला. या  पावसामुळे धरणं भरली कि, पाणी हे सोडायलाच लागत, नाहीतर धरण फुटण्याची शक्यता असते. हे पाणी नदीवाटे जात असताना नदीकाठच्या सगळ्या गावांना हा प्रॉब्लेम येतो, असे पाटील यांनी सांगितले. 

पाटील पुढे म्हणाले  कि, कोल्हापूरला दरवर्षी अतिवृष्टी होते. पूर येतो. मग पुराचं पाणी जे ओव्हरफ्लो होतं  ते आपल्याला उचलता येईल का , आणि ते दुष्काळी भागात शिफ्ट करता येईल का , अशी १० हजार कोटीची जागतिक बँकेने संमत केलेली योजना सध्या सरकार राबवत आहे. पण तोपर्यंत जे नुकसान होत आहे त्याची भरपाई देणं एवढच आपल्या हातात असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. आज पाऊस थोडा थांबला आहे , पाणी ओसरला आहे. या काळामध्ये आता पंचनामे सुरु होतील. सगळ्यांचे झालेलं नुकसान भरून दिल जाईल असे पाटील यांनी सांगितले. 
 
चंद्रकांत पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले कि मी लोकसहभागातून ज्या लोकांचे नुकसान  झाले आहे त्यांना भरपाई देण्याचा प्रयत्न करणार आहे. महिलांना  साड्या, विद्यार्थ्यांना कपडे, पुस्तक, महिनाभराचा किराणा यासारखी मदत मी माझ्याकडून करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.