Latest Marathi News

BREAKING NEWS

एकनाथाच्या राज्यात शेतकरी अनाथ, संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला मदतीचा हात द्या

0

कोल्हापूर | राज्यात तिसऱ्यांदा अवकाळी पाऊसामुळे आणि गारपीटमुळे शेतकऱ्यांची अवस्थाआगीतून फुफाट्यात अशी झाली आहे. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी खडे बोल सुनावले आहेत. एकनाथाच्या राज्यात शेतकरी अनाथ झाल्याचे राजू शेट्टी म्हणाले. आज माध्यमांशी बोलताना शेतकऱ्यावर ओढवलेल्या संकटावर शेट्टी बोलत होते

राजू शेट्टी म्हणाले की, राज्यात बेमोसमी अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे राज्यात कांदा द्राक्ष, भोपळा, भाजीपाला, पेरु यांचे अतोनात नुकसान झाले आहे. तळहातावरच्या फोडाप्रमाणे शेतकरी आपलं पीक जपत असतो, पण निसर्गाच्या फटक्याने होत्याचं नव्हतं होते. एकनाथाच्या राज्यात शेतकरी अनाथ झाला आहे. मुख्यमंत्रीसाहेब प्रभू रामचंद्राचे दर्शन घ्यायचं असेल, तर खुशाल घ्या. ती तुमची व्यक्तिगत बाब आहे. मात्र, राज्य प्रमुखाला व्यक्तिगत बाबींपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असतात आणि कर्तव्याकडे लक्ष देणं गरजेचं असतं.

त्यांनी सांगितले की, राज्यातील शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडू नका. ज्या प्रभू रामचंद्राच्या दर्शनाला गेला आहात त्या प्रभू रामचंद्रानं प्रजेला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं म्हणून आज जनता म्हणते रामाचं राज्य आलं पाहिजे. आणि तुमच्या राज्यात रामाचं राज्य निर्माण करायचं असेल, तर अडचणीत आणि आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला मदतीचा हात द्या, एवढीच कळकळीची विनंती आहे.

राज्यातील तिसऱ्या अवकाळी पावसाने 14 जिल्ह्यातील 28 हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे. सर्वाधिक नुकसान नाशिक जिल्ह्यातील आठ हजार हेक्टर शेतातील उभ्या पीकांचे नुकसान झालं आहे. त्याखालोखाल नगर जिल्ह्यात 7 हजार 305 हेक्टरवर नुकसान झालं आहे. अवकाळी पावसाचा मोठा फटका राज्यातील शेती पिकांना बसला आहे. यामध्ये फळबागांचे मोठं नुकसान झालं आहे. द्राक्ष, आंबा, केळी संत्रा, काजू या बागांना पावसाचा मोठा फटका बसला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.