Latest Marathi News

BREAKING NEWS

एकनाथ खडसे गटाला मोठा धक्का, वाचा सविस्तर वृत्त

0

 

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना मोठा धक्का बसला आहे. भुसावळ नगरपालिकेमधील एकनाथ खडसे समर्थक माजी नगराध्यक्ष रमण भोळे यांच्यासह दहा खडसे समर्थक माजी नगरसेवक अपात्र ठरले आहे. त्यामुळे खडसे गटामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. भुसावळ नगरपालिकेचे तत्कालीन भाजप लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे यांनी आपला कालावधी संपण्याच्या आधी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षात प्रवेश केला होता. याबाबत भुसावळ नगरपालिकेच्या भाजप नगरसेविका पुष्पापत्रा यांनी पक्ष बंदी कायदा अंतर्गत याचिका दाखल केली होती. या याचिकेवर जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी झाली.

यात तत्कालीन नगराध्यक्ष तथा खडसे समर्थकांसह दहा नगरसेवकांना अपात्र ठरण्यात आले आहे. त्यामुळे एकनाथ खडसे गटाला मोठा धक्का मानला जात आहे. पक्षांतर बंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी भुसावळचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे यांच्यासह 10 नगरसेवकांना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी पाच वर्षांसाठी अपात्र केले.

या सर्वांनी भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. या निकालामुळे खडसे आणि भाजपचे आमदार संजय सावकारे यांच्यातील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्ह आहे

Leave A Reply

Your email address will not be published.