Latest Marathi News

BREAKING NEWS

सोलापूरचा कायापालट करण्याचा प्रयत्न : पालकमंत्री

0

सोलापूर |

 

सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर आणि   हुतात्मा मल्लप्पा धनशेट्टी, हुतात्मा श्रीकिसन सारडा, हुतात्मा जगन्नाथ शिंदे व हुतात्मा अब्दुल कुर्बान हुसेन यांचा पुतळा परिसर सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन तसेच महापालिकेच्या कौन्सिल हॉलसमोरील उद्यानातील  विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानपत्र प्रदान स्मृती शिलालेखाचे अनावरण पालकमंत्री राधाकृष्ण विखे – पाटील यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले.

दरम्यान, याप्रसंगी बोलताना पालकमंत्री राधाकृष्ण विखे – पाटील म्हणाले, सोलापुरात महापुरुषांच्या पुतळ्यास अभिवादन करून आशीर्वाद घेतले. महापुरुषांच्या आशीर्वादातून नवी ऊर्जा मिळते. या जिल्ह्याला ऐतिहासिक, धार्मिक व पौराणिक इतिहास आहे. सोलापूरचा कायापालट करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली

भूमिपूजन व अनावरण या  कार्यक्रमास खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आमदार सुभाष देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी , आमदार राम सातपुते , आमदार समाधान अवताडे,माजी आमदार नरसिंग मेंगजी, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर , महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, माजी महापौर श्रीकांचना यन्नम,  माजी सभागृह नेते श्रीनिवास करली, माजी विरोधी पक्ष नेते अमोल शिंदे, माजी गटनेते आनंद चंदनशिवे माजी नगरसेविका संगीता जाधव, माजी नगरसेविका मेनका राठोड,माजी नगरसेविका राजेश्री चव्हाण,प्रयास संस्थेचे सचिन शिंदे यांच्यासह पदाधिकारी व अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
जाज्वल्य देशभक्तीचे प्रतिक असलेल्या या चार हुतात्मा पुतळ्यांचा परिसर स्वच्छ आणि सुशोभीत करण्याची मागणी होती. या कामाचे भूमीपूजन करण्यात आले आहे. राजेश मुंगळे यांच्या सागर कन्स्ट्रक्शनला हा मक्ता देण्यात आला आहे. तसेच विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सोलापूर नगरपालिकेने मानपत्र अर्पण केले होते. या घटनेचे स्मरण म्हणून महापालिकेच्या कौन्सिल हॉलसमोरील उद्यानात मानपत्र प्रदान स्मृती शिलालेख बसवण्यात उभारण्यात आला आहे. या शिलालेखाचे अनावरण आज मंगळवारी पालकमंत्री राधाकृष्ण विखे – पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.  या शिलालेख उभारणीसाठी 2 लाख ९५ हजार रुपये खर्च आला आहे. महाराणा प्रताप कन्स्ट्रक्शन कंपनीला या कामाचा मक्ता देण्यात आला होता.
याप्रसंगी महापालिकेचे नगर अभियंता संदीप कारंजे, उपअभियंता एस. एम. आवताडे, उद्यान अधीक्षक रोहित माने यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी यांची उपस्थिती होती.

Leave A Reply

Your email address will not be published.