दाओसमध्ये पहिल्याच दिवशी महाराष्ट्र राज्याला ४५ हजार ९०० कोटी रुपयांची गुंतवणूक मिळाली असून सुमारे १० हजार लोकांना प्रत्यक्षपणे रोजगार मिळणार असल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. स्वित्झर्लंड येथील दाओसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या विद्यमाने आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध कंपन्यांसमवेत सामंजस्य करार करण्यात आले. या माध्यमातून मोठ्या प्रमाणात तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. सुमारे 10 हजार तरुणांच्या हाताला काम मिळणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली. दाओस येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी आगमन झाले आहे. त्यांनी दाओस येथे सज्ज असलेल्या महाराष्ट्र पॅव्हेलियनला भेट दिल्याचे सामंत यांनी सांगितले.
महाराष्ट्र पॅव्हेलियनमध्ये राज्याच्या प्रगतीचे प्रभावी दर्शन घडवले जाणार आहे. तसेच महत्वाच्या उद्योगांसमवेत सामंजस्य करारही केले जाणार जाणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली. Greenko Energy Projects Pvt.Ltd , Berkshire Hathaway Home Services Orenda India CP Investments/ Indus Capital Rukhi Foods 480 Nipro Pharma Packaging India Pvt. Ltd. या कंपन्यांबरोबरकरार करण्यात आल्याची माहिती सामंत यांनी दिली आहे