कोल्हापूर : अत्यंत मानाचा समजला जाणारा यंदाचा ३५ वा राजर्षी शाहू पुरस्काराची घोषणा वैद्यकीय क्षेत्रात अतुलनिय कामगिरी करणाऱ्या डॉ. तात्याराव लहाने यांना घोषीत झाला. कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. एक लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे. दरम्यान, उद्या शुक्रवारी साजरी होणाऱ्या लोकराजा राजर्षी शाहू महाराज जयंतीची जय्यत तयारी कोल्हापुरात सुरू आहे. राजर्षी शाहू यांचे जन्मस्थळ लक्ष्मी विलास पॅलेस (कसबा बावडा) आणि दसरा चौक व नर्सरी बागेतील राजर्षी शाहू समाधीस्थळाला राजर्षी शाहू स्मारक ट्रस्ट, जिल्हा व मनपा प्रशासनातर्फे अभिवादन करण्यात येणार आहे.
यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जयंती सोहळा मिरवणुकांशिवाय साध्या पद्धतीने साजरा होणार असला, तरी प्रबोधनात्मक व लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन शाहूप्रेमी संस्था, संघटनांच्या वतीने करण्यात आले आहे. मराठा महासंघातर्फे ग्रंथवाचन अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे राजर्षी लेखमालाचे आयोजन करण्यात आले आहे.
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू प्रतिष्ठानतर्फे पुरस्कार लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू प्रतिष्ठानतर्फे राजर्षी शाहूंच्या प्रतिमेचे पूजन दि. 26 रोजी सायंकाळी 5 वाजता बिंदू चौकात होईल. जैताळ (ता. करवीर) येथे 100 वृक्षांचे रोपण करण्यात येणार आहे. प्राचार्य डॉ. जे. के. पवार लिखित ‘बालकल्याण चे प्रणेते : राजर्षी शाहू महाराज’ या पुस्तकाचे प्रकाशन राजर्षी शाहू जयंतीदिनी होणार आहे. दुपारी 4 वाजता बालकल्याण संकुलाच्या प्रांगणात कार्यक्रम होत आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपूरकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि अ.भा. मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंत मुळीक यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा होत आहे.
मावळा संघटनेतर्फे सेवाभावी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी 6 वाजता, बेलबाग येथील अजिंक्यदत्त हॉल येथे हा कार्यक्रम होईल. उमेश सूर्यवंशी यांचे ‘राजर्षी शाहू : जीवन कार्य’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. राजर्षी शाहू सेनेतर्फे रक्तदान, वृक्षारोपण राजर्षी शाहू सेनेतर्फे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, दि. 26 जून रोजी सकाळी 7 वाजता, पंचगंगा नदी घाट परिसर स्वच्छता मोहीम व वृक्षारोपण करण्यात येणार आहे. यानंतर 9 ते 1 यावेळेत राजर्षी शाहू स्मारक, दसरा चौक येथे रक्तदान शिबिर होणार आहे.