Latest Marathi News

BREAKING NEWS

दिग्दर्शक राम गोपाल वर्माच्या ट्विट विरोधात भाजपची पोलिसांकडे तक्रार

0

 

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी भाजपतर्फे घोषणा करण्यात आलेल्या आदिवासी महिला नेत्या द्रौपदी मुर्मू यांच्याविषयी चित्रपट निर्माते राम गोपाल वर्मा यांनी वादग्रस्त ट्विट केले आहे. त्यांच्या या ट्विटवरून संतप्त झालेल्या भाजपने राम गोपाल वर्माविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. भाजप नेते गुडूर नारायण रेड्डी आणि टी. नंदेश्वर गौड यांनी वर्मा यांच्याविरोधात हैदराबादमधील अबिड्स पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

वर्मा यांनी मुर्मू यांच्यावर अपमानास्पद टिप्पणी केल्याचा आरोप यावेळी भाजप नेत्यांनी केला, तसेच त्यांनी वर्मा यांच्या अटकेची मागणीही केली. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू एनडीएच्या उमेदवार आहेत. राम गोपाल वर्मा यांनी 22 जून रोजी वादग्रस्त ट्विट केले होते. त्यात लिहिले आहे की, ‘जर द्रौपदी राष्ट्रपती असेल तर पांडव कोण आहेत? आणि महत्त्वाचे म्हणजे कौरव कोण आहेत?’

भाजपच्या तक्रारीनंतर हैदराबाद पोलिसांनी आवश्यक ती कायदेशीर कारवाई करणार असल्याचे सांगितले. भाजपच्या आंध्रप्रदेश युनिटचे प्रमुख सोमू वीरराजू यांनी वर्मा यांच्यावर टीका केली आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. ते म्हणाले की पोलिसांनी वर्मा यांच्या ट्विटची स्वतःहून दखल घेत त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवावा. व त्याला तुरुंगात पाठवावे आणि मानसोपचार तज्ज्ञाने त्याची तपासणी करावी.

तर वर्माने दुसर्‍या ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘सर्व राजकारणी एकमेकांच्या पाठीत खंजीर खुपसण्यात आणि त्यांना खाली खेचण्यात व्यस्त आहेत. लोकांच्या समस्यांकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ कधी मिळेल, हेच त्यांचे प्राथमिक काम आहे, असा प्रश्न पडतो.भाजप नेते गुडूर नारायण रेड्डी म्हणाले की हे ट्विट एससी आणि एसटी लोकांचा अपमान करणारे आहे. वर्मा यांच्या या वक्तव्यामुळे आम्ही दुखावलो आहोत. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर एससी/एसटी अत्याचार कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्याची विनंती केली.

Leave A Reply

Your email address will not be published.