Latest Marathi News

BREAKING NEWS

‘धनुष्यबाण गोठवल्याची बातमी समजल्यावर उद्धव ठाकरे रडले’

0

”बाळासाहेब ज्या देव्हारातील देवांची पूजा करायचे त्या देव्हाऱ्यात धनुष्यबाण ठेवले होते, त्याची पूजा देखील बाळासाहेब करायचे, ते चिन्ह आज गोठवलं आणि हे सांगताना उद्धव ठाकरे यांचा बांध फुटला. ज्या चिन्हावर तुम्ही मंत्री झालात, निवडून आला, तेच चिन्ह तुम्ही गोठवलं. आज उद्धव ठाकरेंच्या डोळ्यात पाणी आले, असं म्हणत शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. शिवसेनेकडून आता प्रबोधन यात्रा सुरू करण्यात आली आहे. ही यात्रा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातून सुरू झाली.

या यात्रेदरम्यान आयोजित कार्यक्रमाला शिवसेनेचे नेते विनायक राऊत, भास्कर जाधव, सुषमा अंधारे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. यावेळी भास्कर जाधव यांनी बंडखोर आमदारांवर जोरदार हल्लाबोल केला. ‘दसरा मेळाव्याला शिवतीर्थावर बसलेली मंडळी ही खरी होती तर BKC येथे जमलेली मंडळी गटारी करता जमलेली मंडळी होती. कौजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दुधात केशर पिस्ता घालून गोडी वाढवली जाते पण या ४० गद्दारांनी या दुधात मीठ घातलंय.

कारण काल रात्री यांनी शिवसेनेचे चिन्ह गोठवली, हे कळताच मला रडू आले आणि अतिशय वाईट वाटलं, ज्या चिन्हावर तुम्ही मंत्री झालात निवडून आलात तेच चिन्ह तुम्ही गोठवले आज उद्धव ठाकरेंच्या डोळ्यात पाणी आले, असं म्हणत शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

‘बाळासाहेब ज्या देव्हारातील देवांची पूजा करायचे त्या देव्हाऱ्यात धनुष्यबाण ठेवलं होतं, त्याची पूजा देखील बाळासाहेब करायचे, ते चिन्ह आज गोठवलं आणि हे सांगताना उद्धव ठाकरे यांचा बांध फुटला, असंही जाधव म्हणाले. ‘जयचंद राठोडांमुळे त्यांचा जावई महाराणा प्रताप मोहम्मद घुरीच्या हाती लागले. एकनाथ शिंदे आज तुम्ही भाजपाच्या नादी लागून हेच केलंय.

Leave A Reply

Your email address will not be published.