Latest Marathi News

BREAKING NEWS

देवेंद्र फडणवीसांकडून आचारसंहितेचा भंग; रवींद्र धंगेकर यांची तक्रार

0

कसबा विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्ष अनिमहाविकास आघाडीमद्ध्ये मुख्य लढत होत असून या निवडणुकीत अनेक दिग्गज नेते प्रचारासाठी मैदानात उतरले होते अशातच आता आघाडीने थेट आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर कारवाईची मागणी केली आहे. या संदर्भातील तक्रार मुख्य निवडणूक आयुक्तांकडे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी केली आहे.

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत २३ फेब्रुवारी रोजी केलेल्या भाषणात भाजपचे ज्येष्ठ नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदुत्वाचा उल्लेख करून स्पष्टपणे मतदारांना म्हटले की, ‘हिंदुत्वासाठी मतदान करा. कसबा मतदारसंघ हा हिंदुत्ववादी आहे.’ या जोडीलाच त्यांनी श्री पुण्येश्वर मंदिराचाही उल्लेख करून म्हटले की, काँग्रेस पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी पुण्येश्वर महादेव मंदिराबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी.

तसेच निवडणूक प्रचारात धर्माचा वापर करून समाजात दुही माजवण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचे व त्याद्वारे निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यावर निवडणूक आयोगाने त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांकडे केली आहे. या तक्रारींवर फडणवीसांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये.

Leave A Reply

Your email address will not be published.