x
पीएफआयसारख्या देश विघातक संघटना आहेत, त्यांचा चोख बंदोबस्त केला पाहिजे. पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांना देशात राहण्याचा अधिकार असून पीएफआय संघटेनवर बंदी घातली ती योग्य असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं आहे शिवाय गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या निर्णयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केले आहे.
मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया आणि इतर काही संघटनांवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. पीएफआय संघटनेवर दहशतवादी आणि देशविरोधी कारवाया केल्याचा ठपका तपास यंत्रणांनी ठेवला आहे. पीएफआयच्या कारवाया लक्षात घेऊन तपास यंत्रणांनी संघटनेवर बंदी घालण्याची शिफारस केंद्रीय गृहमंत्रालयाला केली होती. त्यावर गृहमंत्रालयाने अध्यादेश काढत बंदी घातली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिकमध्ये एका धार्मिक कार्यक्रमानिमित्त आले असताना त्यांनी आपले मत व्यक्त केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले कि, पीएफआयसारख्या देश विघातक संघटना आहेत, त्यांचा चोख बंदोबस्त केला पाहिजे. पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांना देशात राहण्याचा अधिकार असून पीएफआय संघटेनवर बंदी घातली ती योग्य आहे. शिवाय पाकिस्तानच्या घोषणा देणाऱ्यांवर कठोर करावाई करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाअसल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. यावेळी पीएफआय सारख्या संघटनेवर बंदी घातल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले आहेत.