Latest Marathi News

BREAKING NEWS

“कृतिशील शिक्षणाची जोड देऊन संस्कारक्षम पिढी घडवावी…!” – चंद्रकांत दादा पाटील

0

कोल्हापूर |

महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर दौऱ्या दरम्यान खेळघर उपक्रमातील शिक्षकांची अनौपचारिक संवाद साधला. आर्थिक दृष्ट्या वंचित असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये अध्ययन क्षमता विकसित करणे व कृतिशील शिक्षणाची जोड देऊन संस्कारित पिढी निर्माण करून देशाला उन्नतीकडे न्यावे, संस्कारक्षम शिक्षणावर भर द्यावा असे प्रतिपादन चंद्रकांत दादा पाटील यांनी केले.

आर्थिकदृष्ट्या वंचित कुटुंबातील विद्यार्थ्यांमध्ये अध्ययनक्षमता विकसित करणे आणि औपचारिक शिक्षणाला अनौपचारिक शिक्षणकृतीची जोड देणे, या उद्देशातून कोल्हापूरमध्ये खेळघर उपक्रम राबवला जातो.

आज या उपक्रमात अध्यापनाचं काम करणाऱ्या शिक्षकांशी पाटील यांनी विविध विषयांवर चर्चा केली. आजची संस्कारित पिढी ही देशाला उन्नतीकडे घेऊन जाईल. यासाठीच खेळघरसारखे उपक्रम समाजाची गरज आहेत. त्यामुळे अध्यापनासह संस्कारक्षम पिढी घडविण्यावर शिक्षकांचा भर असला पाहिजे, असे आवाहन हि पाटील यांनी यावेळी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.