Latest Marathi News

BREAKING NEWS

भ्रष्टाचाराचा आरोप करून त्यांनाच मंत्रीपदे देणारे भाजप वॉशिंग मशीन – काँग्रेस

0

अजित पवार यांनी शरद पवार यांची साथ सोडून शिंदे फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री एड्सची शपत घेतली या शपथविधीनंतर राज्यभरातून प्रतिक्रिया उमटत असून आता काँग्रेसने भाजपवर निशाणा साधला आहे. ७० हजार कोटी रूपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसवर करून नंतर त्यांनाच पक्षात घेऊन मंत्रीपदे देणाऱ्या भारतीय जनता पक्ष म्हणजे भाजप वॉशिंग मशिन आहे. तसेच धुलाई पावडर आहे.

कारण भ्रष्टाचारी लोक त्यांच्यात गेले की पावन होतात असा आरोप करत काँग्रेसच्या शहर शाखेने सोमवारी सकाळी आंदोलन केले. भाजपच्या शहर कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.भाजपच्या शहर कार्यालयासमोरच्या रस्त्यावर आंदोलकांनी वॉशिंग मशिनची प्रतिकृतीच आणली होती. त्यावर भाजप वॉशिंग मशिन असे ठळक अक्षरात लिहिले होते. त्यात मोहन जोशी यांनी भ्रष्टाचार असे लिहिलेले काळा टी-शर्ट टाकला. त्यात भाजप वॉशिंग पावडर टाकली व थोड्या वेळाने त्यातून पांढरा शुभ्र टी-शर्ट काढलून दाखवला.

जोशी म्हणाले, “सध्या देशभर हाच उद्योग चालला आहे. केंद्रीय तपास यंत्रणाचा दबाव टाकायचा. आरोप करायचे, ईडीची नोटीस पाठवायची व नंतर त्याच लोकांना भाजपत घ्यायचे किंवा सत्तेला त्यांचा पाठिंबा घ्यायचा. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यापासून ते आता अजित पवार यांच्यापर्यंत शेकडो जणांना याच पद्धतीने त्यांनी स्वच्छ केले आहे.” काँग्रेस अशा भ्रष्ट राजकारणाच्या कायम विरोधातच आहे, संतमहंतांच्या महाराष्ट्र भूमीत या प्रकारचे राजकारण चालणार नाही हे मतदार त्यांना दाखवून देतील असा इशारा जोशी यांनी दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.