Latest Marathi News

BREAKING NEWS

काँग्रेस सोडणार असल्याच्या चर्चांबाबत अशोक चव्हाण म्हणतायत की,

0

काँग्रेस नेते तथा माजी मंत्री अशोक चव्हाण हे काँग्रेस पक्ष सोडणार असल्याच्या चर्चांना नांदेड मध्ये उधाण आलं आहे.पण खुद्द अशोक चव्हाण यांनी यावर स्पष्टीकरण देत मी काँग्रेस पक्ष सोडणार नसल्याचं सांगितलं. दरम्यान या चर्चांना काही महत्त्व नाही, असा कुठलाही निर्णय मी घेतलेला नाही, अशी प्रतिक्रिया देत अशोक चव्हाण यांनी या चर्चांवर पडदा पाडला आहे.

अशोक चव्हाण नाराज असल्याच्या चर्चाराज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आलं. या नव्या सरकारच्या बहुमत चाचणीच्या वेळी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यासह तीन आमदार सभागृहात उशिरा पोहोचले, परिणामी ते मतदान करु शकले नाही. तर त्याचवेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पाठिशी असणाऱ्या अदृश्य हातांचे आभार मानले होते. यानंतर पक्षविरोधी कारवाई केल्याप्रकरणी काँग्रेसने अशोक चव्हाण यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यामुळे चव्हाण नाराज असल्याचं म्हटलं जात होतं. काँग्रेस पक्षातूनच अशोक चव्हाण यांची कोंडी केली जात आहे. त्यामुळे ते पक्ष सोडणार असल्याची चर्चा नांदेड जिल्हाभरात रंगली होती.

परंतु स्वत: अशोक चव्हाण यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. “आज सकाळी नांदेड येथे प्रसारमाध्यमांसमक्ष मी माझी भूमिका स्पष्टपणे मांडली. मी भारतीय जनता पक्षात जाणार असल्याच्या बातम्या निराधार आहेत. असा कोणताही निर्णय मी घेतलेला नाही,” असं ट्वीटही चव्हाण यांनी केलं आहे. त्यामुळे जिल्हाभरात अशोक चव्हाण यांच्याविषयी रंगलेल्या चर्चांना तूर्तास तरी विराम मिळाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.