Latest Marathi News

BREAKING NEWS

ग्रामसेविकाला निलंबित करा म्हणून काँग्रेसचे आंदोलन

0

बार्शी:

बार्शी तालुक्यातील ग्रामपंचायत सौंदरे येथील ग्रामसेविका श्रीमती नागरगोजे यांना निलंबन करावे या मागणीसाठी युवक काँग्रेस बार्शी विधानसभा अध्यक्ष निखिल मस्के व तक्रारदार ओमप्रसाद अनपट यांनी सोलापूर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक दिलीप स्वामी यांच्या निषेध व्यक्त करत आखे तो खोलो स्वामी.. कारवाई करो स्वामी. असे म्हणत स्वामी यांचा प्रतीकात्मक पुतळा बसून लक्षवेधी आंदोलन करण्यात आले यावेळी सोलापूर महानगपालिका गटनेते चेतनजी नरोटे,नगरसेवक विनोदजी भोसले, सुशीलजी बंडपट्टे वरीष्ठ उपाध्यक्ष, युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रवीणजी जाधव, माजी युवक अध्यक्ष राहुलजी वर्धा, एन. एस.यु.आयचे जिल्हाध्यक्ष शरदजी घुमटे,अभिषेक गायकवाड आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.