मुंबई: महाविकास आघाडी सरकारमध्ये असणाऱ्या तिन्ही पक्षातील नेत्यांमध्ये मतभेद दिसून येत आहेत. सरकारकडून सुरु करण्यात आलेल्या महाजॉब्स योजनेच्या जाहिरातीवरून आता कॉंग्रेस नेत्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी शिवसेना – राष्ट्रवादीला सुनावल्यानंतर आता माजी खासदार राजीव सताव यांनी आघाडीधर्माची आठवण करून दिली आहे.
काही दिवसांपूर्वीच महाजॉब्स ही योजना सुरु झाली. या योजनेच्या जाहिरातीत मुख्यमंत्री आणि संबंधित खात्याच्या मंत्र्यांचे फोटो आहेत. खात्याचे कॅबिनेटमंत्री आणि राज्यमंत्री शिवसेना आणि राष्ट्रवादीचे आहेत. यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोटो आहेत. पण काँग्रेसच्या नेत्याचा फोटो नाही, यामुळे नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
योजना चांगली आहे आणि आमचे पूर्ण सहकार्य आहेच. फक्त सरकार आघाडीचे आहे याची काळजी लोकांसमोर जाताना सर्वांनीच घ्यायला हवी. येत्या काळात या जाहिरातीत दुरुस्ती होईल अशी आशा. पुन्हा अशी चूक होणार नाही या खात्रीसोबत, असे ट्विट राजीव सातव यांनी केले आहे.
योजना चांगली आहे आणि आमचे पूर्ण सहकार्य आहेच. फक्त सरकार आघाडीचे आहे याची काळजी लोकांसमोर जाताना सर्वांनीच घ्यायला हवी. येत्या काळात या जाहिरातीत दुरुस्ती होईल अशी आशा. पुन्हा अशी चूक होणार नाही या खात्रीसोबत. pic.twitter.com/kQYnyhlMO1
— MLC Dr.Pradnya Rajeev Satav (@SATAVRAJEEV) July 16, 2020
दुसरीकडे सत्यजित तांबे यांनी जाहिरातीवर कॉंग्रेस नेत्यांचा फोटो नसल्याने यामुळे तांबे यांनी महाजॉब्स योजना महाराष्ट्र विकास आघाडी सरकारची आहे की शिवसेना – राष्ट्रवादीची ? असा सवाल केला आहे. आघाडीचे गठन होत असतांना, ठरलेल्या किमान समान कार्यक्रमाची व त्यातील शिष्टाचारांची अंमलबजावणी का होत नाही ? हा माझ्या सारख्या सामान्य काँग्रेस कार्यकर्त्याला पडलेला प्रश्न आहे. असं तांबे यांनी म्हटलं आहे.
#महा_जाॅब्स् ही योजना महाराष्ट्र विकास आघाडी सरकारची आहे, की शिवसेना-राष्ट्रवादीची ?
आघाडीचे गठन होत असतांना, ठरलेल्या किमान समान कार्यक्रमाची व त्यातील शिष्टाचारांची अंमलबजावणी का होत नाही ? हा माझ्या सारख्या सामान्य काॅंग्रेस कार्यकर्त्याला पडलेला प्रश्न आहे. pic.twitter.com/k8CMmOsmJv— Satyajeet Tambe (@satyajeettambe) July 16, 2020
तांबे यांनी ट्विटसोबत तांबे फोटो जोडलेला आहे. ज्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक आणि राज्यमंत्री आदिती तटकरे यांचा फोटो आहे. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांना राज्य सरकारमध्ये डावलण्यात येत असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली आहे.