Latest Marathi News

BREAKING NEWS

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आदित्य ठाकरेंना दणका, घेतला हा निर्णय

0

 

मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपच्या जोरावर बहुमत सिद्ध केल्यानंतर आता चांगलेच कामाला लागले आहे. महाविकास आघाडी सरकारने घेतलेले काही निर्णय आणि अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटा लावला आहे. शिवसेनेचे नेते आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या जवळचे समजले जाणाऱ्या अधिकाऱ्यांची शिंदेंनी बदली केली आहे.

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळताच मुंबई महानगरपालिकेतील 3 प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. धारावीचे कोविड-19 संकट हाताळण्यासाठी ओळखले जाणारे सहाय्यक महापालिका आयुक्त किरण दिघावकर यांची दादर येथील बृहन्मुंबई महापालिकेच्या प्रभाग कार्यालयातून भायखळा येथे बदली करण्यात आली आहे. दिघावकर यांच्या जागी प्रशांत सपकाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे, जे सध्या पश्चिम उपनगरातील के/पूर्व (अंधेरी पूर्व, जोगेश्वरी) प्रभाग कार्यालयाचे प्रमुख आहेत.

दरम्यान, सपकाळे यांच्या जागी सध्या भायखळा प्रभागाचे प्रभारी मनीष वलंजू यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दिघावकर यांनी जी/उत्तर (जी/एन) वॉर्डचे वॉर्ड ऑफिसर म्हणून काम केले. त्यांनी दादर, माहीम आणि धारावी परिसराचा तीन वर्षे समावेश केला आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या जवळचे अशी ओळख आहे. मात्र या बदलीमुळे एकप्रकारे आदित्य ठाकरे यांना दणका देण्याचा शिंदे गटाने निर्णय घेतला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.