Latest Marathi News

BREAKING NEWS

चोरांच्या सरदाराला डाकू म्हटलं तर गुन्हा होत असेल तर… नाना पटोले यांचा भाजपाला टोला

0

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी आडनावावरून केलेल्या टिप्पणीवरून त्यांना कोर्टाने २ वर्षाची शिक्षा सुनावली होती याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली याच मुद्दावरून राज्यातील नाही तर संपूर्ण देशातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते अशातच आता या कारवाईवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

चोराला चोर म्हणणं हा गुन्हा असेल आणि चोराचा सरदार जो आहे त्याला डाकू म्हटलं तर गुन्हा आहे तर आम्ही हा गुन्हा सातत्याने करू. आमचं सदस्य रद्द करायचं असेल तर त्यांनी ते करावं. लोकशाहीचे रोज मुडदे पाडण्याचं पाप बीजेपी करत आहे. त्याच्या विरोधात आम्ही लढू. कारण हा काँग्रेसचा अधिकार आहे असे विधान पटोले यांनी केले होते.

तसेच पुढे बोलताना पाटोळे म्हणाले की, या देशाला पारतंत्र्यातून मुक्त करण्याचं, देशाला उभं करण्याचं आणि या देशाच्या प्रत्येक व्यक्तीला मुख्य प्रवाहात आणण्याचे काम काँग्रेसनं केलंलं आहे. पण नरेंद्र मोदींच्या सरकारच्या माध्यमातून देशाची संपत्ती विकून देत चालवला जात आहे. हा देश बरबाद केला जातोय. संविधानिक व्यवस्थेला तुडवलं जातयं. जनतेच्या सहकाऱ्यांना या हुकूमशाही व्यवस्थेला निसनाभूत करू असही पटोले म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.