Latest Marathi News

BREAKING NEWS

३१ मार्चपर्यंत बँकांना राहणार नाही एकही सुट्टी, रविवारीही होईल काम

0

मुंबई |

२०२२-२०२३ चं आर्थिक वर्ष सुरु होण्यास अगदी काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. १ एप्रिलसह नवीन फायनेंशियल ईयर सुरु होणार आहे. मार्च महिन्यातच सर्व अकाउंटचा हिशोब केला जातो. अशा परिस्थितीत रविवारी सर्व बँका खुल्या ठेवण्याच्या सूचना आरबीआयकडून देण्यात आल्या आहेत.

३१ मार्च हा चालू आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस आहे. या दिवशी बँकांमध्ये क्लोजिंगचे काम केले जाते. यासोबतच सध्या ऑनलाइन बँकिगही सुरु राहील. ३१ मार्चनंतर सलग २ दिवस म्हणजेच १ आणि २ एप्रिलला बँकांमध्ये कामकाज होणार नाही. ३१ मार्चपूर्वी आधार पॅनशी लिंक करा. तुम्ही असे न केल्यास १ एप्रिलपासून तुमच्या पॅनचा काहीही उपयोग होणार नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.