पुणे |
पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी पीएमपीएमएल भवनाला भेट देऊन, अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांच्या कडून पीएमपीएमएलच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेऊन प्रवाशांना चांगल्या सेवा कशा देतात देता येतील या संदर्भातही चंद्रकांतदादांनी सूचना केल्या. १४ ऑक्टोबर रोजी प्रकाश बकोरिया यांनी पी एम पी च्या कामाचा कार्यभार हाती घेतला होता, बकोरिया हे धडाकेबाज अधिकारी म्हणून ओळखले जातात. पी एम पी वेग कसा वाढवता येईल यावरही सविस्तर चर्चा झाली.
यावेळी माजी सभागृह नेते गणेश बिडकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, भाजपा पुणे शहर संघटन सरचिटणीस राजेश पांडे यांच्या सह पीएमपीएमएलचे अधिकारी उपस्थित होते.