मुंबई |
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पदाची शपथ घेतल्यापासून विकास कामाचा झपाटा लावला आहे, आज १ नोव्हेंबर रोजी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी कॅबिनेट मंत्री शंभूराजे देसाई यांच्या शासकीय निवासस्थानी भेट दिली.

राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या मुंबई येथील ‘पावनगड’ या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी वने,सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे,उद्योग मंत्री उदय सामंत, अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड उपस्थित होते.