Latest Marathi News

BREAKING NEWS

उच्च व तंत्रशिक्षण विभागाद्वारे आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाइन वेबिनारच्या माध्यमातून चंद्रकांत पाटील यांनी विद्यार्थ्यांशी साधला संवाद

0

ऐरोली : ऐरोली येथील पार्थ नॉलेज नेटवर्क येथे उच्च व तंत्रशिक्षण विभागाद्वारे आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाइन वेबिनारला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. राज्यातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने विविध शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात येतो. या शिष्यवृत्ती योजनांची एकत्रित माहिती विद्यार्थी, पालक व संस्था प्रतिनिधींना व्हावी, यासाठी ऑनलाइन वेबिनारच्या माध्यमातून विद्यार्थी, पालक, संस्थाचालक यांच्याशी पाटील यांनी संवाद साधला.

चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि, नवीन शैक्षणिक धोरणानुसार (NEP) व्यावसायिक शिक्षणातील मुलींचे प्रमाण वाढावे यासाठी ज्या कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा पालकांच्या मुलीचे पदवी, पदविका व पदव्युत्तर पदवीचे शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेसाठी महाडीबीटी पोर्टल सुरू करण्यात आले आहे. या अनुषंगाने माहाडीबीटी पोर्टल https://mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा, असे आवाहन यावेळी पाटील यांनी केले.

यावेळी दूरदृश्यप्रणालीद्वारे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या प्रधान सचिव विनिता सिंगल, तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, तंत्र शिक्षण संचालक डॉ.विनोद मोहितकर, उच्च शिक्षण संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकर संबधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

या वेबिनारमध्ये संपूर्ण राज्यातून जवळपास 6 हजार शैक्षणिक संस्था सहभागी झाल्या होत्या. तसेच, 47 हजार 247 डिव्हाईस ऑनलाइन कनेक्ट झाले होते. तर, 52 हजार 432 युट्यूबर विद्यार्थी, पालक कनेक्ट होते. यामध्ये जवळपास 5 हजार पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी फीडबॅक नोंदवला आहे. अनेक महाविद्यालयामध्ये एलईडी स्क्रीन लावून मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते. जवळपास 15 लाखापेक्षा अधिक विद्यार्थी या ऑनलाईन संवादामध्ये सहभागी झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.