Latest Marathi News

BREAKING NEWS

श्रीकांत भारतीय यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या मोफत रक्तपुरवठा पंधरवडा योजनेचा शुभारंभ चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न  

0

पुणे, २० सप्टेंबर : देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण देशभरात सेवा पंधरवडा साजरा केला जात आहे. महाराष्ट्र भाजपाचे सेवा पंधरवडा प्रमुख आमदार श्रीकांत भारतीय यांच्या संकल्पनेतून मोफत रक्तपुरवठा पंधरवडा योजना राबविण्यात येत आहे. श्रीकांत भारतीय यांच्या या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ आज भाजपचे ज्येष्ठ नेते तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत यांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजपने सेवा पंधरवडा जाहीर केला आहे. २४ सप्टेंबरपर्यंत देशात विविध कार्यक्रमांचे नियोजन केले आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये रक्तदान शिबिरे घेतली जाणार आहेत. याचाच एक भाग म्हणजे श्रीकांत भारतीय यांनी राबविलेली मोफत रक्तपुरवठा योजना. चंद्रकांत पाटील यांनी या योजनेचा शुभारंभ करत शुभेच्छा दिल्या.

यावेळी एमआयटीचे राहुल कराड, तर्पण संस्थेचे संस्थापक आ. श्रीकांत भारतीय, तर्पण संस्थेचे संचालक शशिकांत जगदाळे उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.