Latest Marathi News

BREAKING NEWS

पुणे भाजपच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान

0

पुणे : पुणे शहर भारतीय जनता पार्टीच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीची नावे ही नुकतीच जाहीर झाली होती. यासंदर्भात नूतनकार्यकारिणीची बैठक गुरुवारी पार पडली. याबैठकीमध्ये सर्व नाव नियुक्त पदाधिकाऱ्यांना भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.

यावेळी उपस्थितांना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मार्गदर्शन देखील केले. यावेळी शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे, पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसाळ, खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भिमराव तापकीर, प्रदेश सरचिटणीस श्री. मुरलीधर मोहोळ, प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, प्रदेश उपाध्यक्ष आणि पुणे शहर प्रभारी अमर साबळे, अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश अध्यक्ष दिलीप कांबळे, प्रदेश मुख्यालय प्रभारी रवी अनासपुरे,माजी अध्यक्ष जगदीश मुळीक,व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.