Latest Marathi News

BREAKING NEWS

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे चंद्रकांत पाटील यांनी केले अभिनंदन

0

पुणे: नुकतीच पुणे श्रमिक पत्रकार संघाची वार्षिक निवडणूक पार पडली या निवडणुकीमध्ये अध्यक्षपदी पांडुरंग सांडभोर (दै. पुढारी) यांची, तर उपाध्यक्षपदी ‘सकाळ’चे प्रिन्सिपल करस्पॉन्डंट उमेश शेळके आणि स्वप्नील शिंदे (महाराष्ट्र टाइम्स) यांची निवड झाली आहे.पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज पत्रकार भवन येथे जाऊन पत्रकार संघाच्या वार्षिक निवडणुकीत विजयी झालेल्या सर्व नूतन पदाधिकाऱ्यांची भेट घेत अभिनंदन केले आणि अनौपचारिक संवाद साधला.

हेही वाचा :“आम्ही शरद पवारांना सल्ला देणार नाही..”,संजय राऊतांच्या या भूमिकेमागील कारण उघड

हेही वाचा :संभाजी भिडेंच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यभर निषेधाचा भडका उडाला; ठाण्यात अजित पवार गटाचे धरणे आंदोलन

पत्रकार संघाच्या कार्यकारिणी सदस्यपदी ‘सकाळ’चे छायाचित्रकार शहाजी जाधव यांचीही निवड झाली असून सरचिटणीसपदी सुकृत मोकाशी (तरुण भारत), खजिनदार अंजली खमितकर (प्रभात), चिटणीस पूनम काटे-कलापुरे (राष्ट्र संचार), प्रज्ञा केळकर-सिंग (पुढारी) यांची निवड झाली आहे. कार्यकारिणी सदस्यपदी हर्ष दुधे, वरद पाठक, श्रद्धा सिदीड (महाराष्ट्र टाइम्स), विक्रांत बेंगळे (आज का आनंद), विजय पुराणिक (पुण्यनगरी), गणेश राख (सामना), संभाजी सोनकांबळे (लोकमत), शंकर कवडे व भाग्यश्री जाधव (पुढारी) यांची निवड झाली आहे. ॲड. प्रताप परदेशी आणि ॲड. स्वप्नील जोशी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले

Leave A Reply

Your email address will not be published.