Latest Marathi News

BREAKING NEWS

आमदार देशमुख यांच्या निवासस्थानी चंद्रकांत दादा पाटलांनी घेतला पाहुणाचार

0

सोलापूर |

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे सोमवारी सोलापूर दौऱ्यावर होते. सायंकाळी त्यांचे शहरात आगमन झाले.रात्री साडे सातच्या सुमारास माजी मंत्री तथा आमदार सुभाष देशमुख यांच्या होटगी रोड वरील निवासस्थानी त्यांची भेट व स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन होते.चंद्रकांत दादा वेळेवर पोहोचले. त्याठिकाणी आमदार सुभाष देशमुख यांच्या संपूर्ण कुटुंबीयांनी त्यांचे स्वागत केले.

आमदार सचिन कल्याणशेट्टी,युवा नेते मोहन डांगरे, युवा नेते मनीष देशमुख, रोहन देशमुख,श्रीनिवास करली उपस्थित होते.बापू यांच्या कुटुंबियांसोबत नामदार दादांनी आपल्या पत्नी सोबत स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला.त्यांनतर बापू समर्थक माजी नगरसेवक,पदाधिकारी,कार्यकर्ते यांनी चंद्रकांत पाटील यांचा सत्कार केला.पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप यांनी भेट घेऊन सत्कार केला.रेडिमेड कापड उत्पादक संघाचे निलेश शहा यांनी भेट घेतली.त्यानंतर चंद्रकांत पाटील हे रवाना झाले.

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सिनेट सदस्य पदी निवड झालेल्या सदस्यांचा सुभाष देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.