Latest Marathi News

BREAKING NEWS

छगन भुजबळांच्या मतदार संघात शरद पवारांची सभा, संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष

0

नाशिक | अजित पवार यांनी बंडखोरी करून भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देत थेट शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झाले होते मात्र या त्यांच्या निर्णयाला प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि सुनील तटकरे या निष्ठावंत नेत्यांनी साथ दिली त्यामुळे शरद पवारांना मोठा धक्का बसला होता. अजित पवारांच्या बंडामुळे राष्ट्रवादीत उभी फूट पडली असून दोन गट पडले आहेत. दोन्ही गटाकडून एकमेकांवर जोरदार टीका करण्यात येत होती. अशातच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात सभा घेणार आहे.

आज शरद पवार यांची छगन भुजबळ यांच्या नाशिकमधील येवला मतदारसंघात जाहीर सभा होणार आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पवारांची ही पहिलीच सभा असून दुपारी ४ वाजता येवला बाजार समितीच्या पटांगणात या सभेला सुरूवात होणार आहे. त्यामुळे शरद पवार या सभेत ते काय बोलणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी राष्ट्रवादीतच राहत भाजपसोबत सत्तेत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यात मोठा राजकीय भूकंप घडला. बंडानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्षासह चिन्हावरही दावा ठोकला आहे. तर दुसरीकडे शरद पवार गटानेही संघर्षाचा पवित्रा घेतल्याने दोन्ही गट आमनेसामने भिडले आहेत.

दरम्यान, शरद पवार यांनी या बंडाचे आव्हान परतून लावण्यासाठी पुन्हा एकदा मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची सुरुवात बंडखोर व कधीकाळी अती विश्वासू छगन भुजबळ यांच्या मतदार संघातून होणार आहे. छगन भुजबळांसह बडखोरांचा ते कसा समाचार घेतात, याकडे अजित पवार गटासह राज्याचे लक्ष लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.