Latest Marathi News

BREAKING NEWS

ड्रग्जप्रकरणात CCB कडून विवेक ओबेरॉयच्या घरी छापा

0

मुंबई : सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास हत्येपासून ड्रग्ज पर्यंत येऊन पोहोचला आहे. ड्रग्ज प्रकरणात अनेक बड्या कलाकार, प्रोड्युसर, आणि इतर लोकांचा समावेश असल्याचं बोललं गेलं. रिया चक्रवर्तीला ड्रग्ज सेवन प्रकरणात जेल वारी देखील करावी लागली आहे. तसेच दीपिका पादुकोन, सारा अली खान, श्रद्धा कपूर यांची देखील चौकशी करण्यात आली.

अशातच बंगळुरू ड्रग्ज प्रकरणात नाव असणारा आदित्य अलवा फरार होता. तो मुंबईत असल्याची माहिती CCB ला मिळाली होती. त्यानुसार मुंबईमध्ये शोध सुरू झाला.
आदित्य अलवा हा विवेक ओबेरॉयचा मेहुणा असल्याने CCB ने विवेक ओबेरॉयच्या घरात छापा मारला आहे. अद्याप विवेकच्या घरातून या बाबतीत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.