Latest Marathi News

BREAKING NEWS

“आगामी महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप सत्तेत येईल” – चंद्रकांतदादा पाटील

पालकमंत्री पदी नियुक्ती झाल्याबद्दल पुण्यामध्ये भाजपकडून सत्कार

0

पुणे |

पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी नियुक्ती झाल्याबद्दल भाजपा पुणे शहरच्या वतीने मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचा सत्कार करण्यात आला. या सत्काराप्रती कृतज्ञता व्यक्त करुन स्वच्छ, सुंदर, सधन, समाधानी, सुरक्षित पुणेसाठी प्रयत्न करणार असा संकल्प यावेळी व्यक्त केला. तसेच, आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपच सत्तेत येईल, त्यासाठी कार्यकर्त्यांनी कठोर परिश्रम घ्यावेत. संघटन वाढीसाठी मी स्वतः आठही मंडलांचा प्रवास करणार असल्याचे मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी स्पष्ट केले.

यावेळी भाजपा पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, आ. माधुरीताई मिसाळ, भीमराव तापकीर, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, माजी मंत्री बाळाभाऊ भेगडे, माजी आमदार बापूसाहेब पठारे, महापौर मुरलीधर मोहोळ, भाजपा नेते योगेश टिळेकर, एस. के. जैन, राजेश पांडे, मकरंद देशपांडे यांच्या सह पुणे शहरातील भाजपाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.