पुणे | विधान परिषद निवडणुकीच्या वेळी पीपीई कीट घालून मतदानाला हजर राहणारे भाजपचे पक्षनिष्ठ आमदार लक्ष्मण जगताप यांचं निधन झालं आहे. लक्ष्मण जगताप यांना कॅन्सरचे निदान झाले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची आज प्राणज्योत मालवली. मागील आठवड्यातच भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांचं निधन झालं होतं. त्यानंतर आज लक्ष्मण जगताप यांनीही जगाचा अखेरचा निरोप घेतला.
पिंपरी चिंचवड विधानसभा क्षेत्राचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांची प्रकृती ही अत्यंत नाजूक होती. त्यामुळे त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. प्रकृती खालावल्यामुळे त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केलं होतं तसेच त्यांच्यावर उचार सुरु होते मात्र ते उपचाराला कोणताही प्रतिसाद देत नव्हते अखेर आज सकाळी त्यांची प्राणजोत मालवली.
चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाले. आपल्या भागातील अतिशय लोकप्रिय नेतृत्व अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनामुळे जगताप कुटुंबावर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत, असं म्हणत राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांनी श्रद्धांजली अर्पण केली तसेच विविध स्थरातून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.