Latest Marathi News

BREAKING NEWS

बिग बॉस मराठी’च्या घरातील ‘या’ सदस्याला थेट रणवीर सिंहचा सपोर्ट

0

कलर्स मराठी वरील बिग बॉस मराठी सिझन चौथासध्या खूप चर्चेत आहे. मग ते टास्क असो त्यातील सदस्यांचे नाते असो किंवा मग सदस्यांमध्ये असलेले वाद विवाद असो स्वत: ला सिध्द करण्याच्या प्रयत्नात घरातला प्रत्येक सदस्य आहे. सदस्यांना टास्क पेक्षा देखील कशाची भीती वाटतं असेल तर ती नॉमिनेशन मध्ये येण्याची. नॉमिनेशन पासून कसे दूर रहाता येईल याच्या प्रयत्नात सदस्य असतात.

महाराष्ट्रातील आपले तमाम प्रेक्षक आपल्या लाडक्या सदस्याला वोट करून सेफ करण्याचा प्रयत्न करतात. स्पर्धकांनी सगळ्या अडचणींवर मात करत नुकतेच घरातील तब्बल 50 दिवस पूर्ण केले आहेत. सगळ्यांसाठी हा टप्पा खूप महत्वपूर्ण होता. आणि त्याच निमित्ताने आपल्या सगळ्यांचा लाडका रणवीर सिंह याने बिग बॉसच्या घरातील एका सदस्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

मात्र तो सदस्य कोण अशी चर्चा सुरु असताना रणवीरने तेजस्विनी लोणारी हिला शुभेच्छा दिली आहेत तसेच जीएनकून आल्यानंतर पार्टी करण्याचे सूचक विधान केले आहे तेजूला शुभेच्छा देणार रणवीरचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रणवीरनं तेजस्विनीला शुभेच्छा दिल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.