Latest Marathi News

BREAKING NEWS

भाजपसोबत जे असतील त्यांच्याबरोबरही आमची युती होऊ शकत नाही!

0

मुंबई | आम्ही कदापि जाणार नाही. तसेच भाजपसोबत जे असतील त्यांच्याबरोबरही आमची युती होऊ शकत नाही, अशी स्पष्ट भूमिका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज मांडली. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री दीपक केसरकर तसेच शिंदे गटाच्या भावना गवळी हे बाळासाहेब आंबडकर यांचे भेट घेण्यसाठी दादर येथील राजगृह या त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे वृत्त समोर येत आहे,

या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आमचे काही ऐतिहासिक मुद्दे आहेत. वैदिक हिंदू समाज रचनेबाबत आमचे भाजपशी भांडण आहे. त्यावर त्यांनी आधी उत्तर दिले पाहिजे. त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत जाऊ शकत नाही. भारतीय जनता पक्षसोबत कोणी जात असेल तर आम्ही त्यांच्यासोबतही जाणार नाही, असे त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत राजगृह येथे झालेल्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.

महाविकास आघाडीचे अजून काही ठरलेले नाही. त्यांचे जोपर्यंत काही ठरत नाही तोपर्यंत आमची त्यांच्यासोबतही युती होऊ शकत नाही. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीकडे स्वबळावर लढण्याशिवाय पर्याय राहत नसल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले. शिवसेनेचे काही नेते मला भेटून गेले. पण 20 तारखेच्या कार्यक्रमानिमित्त भेटून गेले. त्यात राजकीय चर्चा नव्हती. प्रबोधनकार ठाकरे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जवळचा संबंध होता. त्यामुळे मी त्या कार्यक्रमाला हजर राहणार आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.