उत्तरप्रदेश । देशातील अनेक राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाची साता असताना आता विदेशात सुद्धा भाजपचा असताना दिसून येत आहे. अमेरिकेतील प्रमुख वृत्तपत्र वॉल स्ट्रीट जर्नलच्या लेखात भारतीय जनता पक्ष ही जगातील सर्वात महत्त्वाची पार्टी असल्याचं म्हटलं आहे. भाजपा सलग तिसऱ्यांदा २०२४ मध्ये लोकसभा निवडणूक जिंकण्याच्या दिशेने जात आहे.येणाऱ्या काळात भाजपा देशात स्वत:चं वर्चस्व निर्माण करेल. ज्यांच्या मदतीविना अमेरिका चीनच्या वाढत्या ताकदीला रोखू शकत नाही असं अमेरिकेचे प्रमुख नेते वाल्टर रसेल मीड यांनी म्हटलं आहे.
मीड यांनी पुढे लिहिलंय की, अमेरिकेचे राष्ट्रीय हित लक्षात घेता भारतातील सत्ताधारी भारतीय जनता पार्टी जगातील सर्वात महत्त्वाचा राजकीय पक्ष आहे. भाजपा २०१४ मध्ये सत्तेत आले, त्यानंतर २०१९ मध्ये आणि आता २०२४ मध्येही पुन्हा सत्तेच्या दिशेने भाजपा वाटचाल करत आहे. भारत आर्थिकदृष्ट्या सक्षम होत असताना भाजपा देशाच्या राजकारणात सर्वोच्च स्थानी आहे.
तसेच जपानसोबत इंडो पॅसिफिकसाठी भारताची भूमिका अमेरिकेच्या रणनीतीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. नजीकच्या काळात भाजपा देशाच्या निर्णायक भूमिकेत असेल. ज्यांच्या मदतीविना चीनच्या वाढत्या शक्ती रोखण्यासाठी अमेरिकेचे सुरू असलेले प्रयत्न अयशस्वी ठरतील असं त्यांनी सांगितले आहे.
त्याचसोबत भाजपाचा राजकीय आणि सांस्कृतिक इतिहास अनेक परदेशी लोकांना माहिती नाही. त्यामुळे त्यांना हे समजू शकत नाही. मुस्लिम ब्रदरहुड प्रमाणेच, आधुनिकतेची प्रमुख वैशिष्ट्ये स्वीकारताना भाजपाने पाश्चात्य उदारमतवादाच्या अनेक कल्पना आणि प्राधान्यक्रम नाकारले आहेत. चिनी कम्युनिस्ट पक्षाप्रमाणेच, एक अब्जाहून अधिक लोकसंख्या असलेल्या राष्ट्राचे नेतृत्व करून जागतिक महासत्ता बनण्याची भाजपाची अपेक्षा आहे.