कोल्हापूर |
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण आणि वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी त्यांच्या कोल्हापूरातील घरी गुढीपाडव्याचा पवित्र सण साजरा करून हिंदू नववर्षाचे स्वागत केले. हे नूतन वर्ष सर्वांसाठी आनंदाचं, भरभराटीचं आणि आरोग्यदायी जावो, अशी प्रार्थना त्यांनी केली. राज्यातील जनतेला त्यांनी शुभेच्छा दिल्या.
चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून मराठी नववर्षाला सुरूवात होते. गुढी उभारून या नव्या वर्षाचे स्वागत करण्याची आपली परंपरा आहे. चैत्र महिन्यापासून निसर्गात होणाऱ्या चैतन्यदायी परिवर्तनाच्या स्वागताचाही उद्देश या उत्सवामागे आहे. आनंदाची गुढी उभी करतानाच बळीराजाच्या कल्याणाची भावना अतिशय महत्त्वपूर्ण आहे. शेतकरी हिताचे निर्णय शासन घेत असून या कठीण काळात शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे.