Latest Marathi News

BREAKING NEWS

भावना गवळींविरोधात घोषणाबाजी, ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊतांसह या आमदारावर गुन्हा दाखल

0

शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत आणि आमदार नितिन देशमुखांसह इतर काही जणांवर अकोल्याच्या लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अकोला रेल्वे स्थानकावर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांच्या विरोधात ‘गद्दार-गद्दार’ अशी जोरदार घोषणाबाजी केली होती.

याप्रकरणी खासदार विनायक राऊत आणि आमदार नितीन देशमुख यांच्यासह अन्य कार्यकर्त्यावर आज रात्री उशीरा अकोला जीआरपी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणे, जमाव जमवणे, एकत्रित येऊन घोषणाबाजी करणे, अश्लील भाषेत बोलणे अशा कलमांतर्गत हे गुन्हे दाखल झाले आहेत.

अकोला रेल्वे स्थानकावर काल शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी आणि ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत आमने-सामने आले होते. रात्री सव्वानऊच्या सुमारास ही घटना घडली होती. विदर्भ एक्सप्रेसने दोन्ही खासदार मूंबईकडे निघतांना दोघेही अकोला रेल्वे स्थानकावर समोरा-समोर आले होते. यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी भावना गवळींसमोर ‘गद्दार-गद्दार’ अशी घोषणाबाजी केलीय.

भावना गवळी डब्याच्या बाहेर आल्यानंतरही ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची प्रचंड घोषणाबाजी केली. या घोषणाबाजीच्या वेळी आमदार नितीन देशमुखही रेल्वे स्थानकावर उपस्थित होते. यावेळी खासदार गवळी बसलेल्या डब्याच्या खिडकीवर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी बुक्क्या मारल्याचंही समोर आलं होतं या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे

Leave A Reply

Your email address will not be published.