Latest Marathi News

BREAKING NEWS

गुजरात निवडणुकीसाठी भाजपची जोरदार तयारी… अनिकेत भाई यांना बहुमताने विजयी करण्याचे चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

0

पालनपूर, गुजरात :  भाजपचे ज्येष्ठ नेते आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे सध्या गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत. गुजरात विधानसभा निवडणुकीत पालनपूर मतदारसंघाचे उमेदवार श्री अनिकेत भाई ठाकरजी यांच्या निवडणूक दौऱ्याच्या पहिल्या दिवशी चंद्रकांत पाटील यांनी ग्रामसभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी अनिकेत भाई यांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहनही केले.  

पालनपूर शहरात सध्या निवडणुकीच्या प्रचारार्थ वैयक्तिक बैठकांची मलिक सुरु आहे. यावेळी  चंद्रकांत पाटील यांनी जुने मित्र फलजीभाई चौधरी, जैन समाजाचे ज्येष्ठ आणि प्रसिद्ध उद्योजक दिलीपभाई शाह यांची भेट घेतली. पालनपूर शहरातील कडवा  पाटीदार समाजाच्या मेळाव्याला चंद्रकांत पाटील उपस्थित राहिले. त्यांनी यावेळी म्हटले कि, कोल्हापुरातील पाटीदार समाजाशी माझा वर्षानुवर्षे संबंध आहे. आज या समाजाने अनिकेत भाईंना विजयी करण्याचा संकल्प केला आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.

पालनपूर शहरात माळी समाजाचा मोठा मेळावा झाला. या मेळाव्याला भरपूर गर्दी होती.  यामेळाव्याला उपस्थित असलेली गर्दी पाहून अनिकेत भाईंच्या विजयला सुरुवात झाली आहे, त्याची प्रचिती आजच दिसून येत आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. या मेळाव्याला वेदांत स्वामीजी, हर्षद भाई माळी, शांतीलाल पढियार , महेंद्रभाई , दशरथ सिंग आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.