Latest Marathi News

BREAKING NEWS

भारतनिर्मित आणखी एक कफ सिरप दूषित, जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

0

नवी दिल्ली | भारतात तयार होणाऱ्या आणखी एका कफ सिरपच्या गुणवत्तेवर जागतिक आरोग्य संघटनेने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. वैद्यकीय इशारा जारी करून, जागतिक आरोग्य संघटनेने भारतात तयार केलेल्या कफ सिरपला दूषित म्हटले आहे. मार्शल आयलंड आणि मायक्रोनेशियामध्ये एका भारतीय कंपनीचे कफ सिरप दूषित असल्याचे डब्ल्यूएचओने म्हटले आहे. या आरोपांमुळे एकाच खळबळ उडाली आहे;

या वैद्यकीय अलर्टमध्ये डब्ल्यूएचओने भारतात बनवलेल्या कफ सिरपमुळे कोणतीही जीवितहानी झाली आहे की नाही हे सांगितले नाही. परंतु, डब्ल्यूएचओचे असे म्हणणे आहे की, ग्वायफेनेसिन सिरप टीजी सिरपसोबत डायथिलीन ग्लायकॉल आणि इथिलीन ग्लायकॉलचे घटक आढळले आहेत. त्याच्या वापरामुळे मानवाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. हे रसायन ऑस्ट्रेलियन नियामकाने ओळखले होते. 6 एप्रिल रोजी ही माहिती डब्ल्यूएचओला देण्यात आली.

दरम्यान, डब्ल्यूएचओच्या या इशाऱ्यावर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. सूत्रांचे म्हणणे आहे की डब्लूएचओचा ई-मेल मिळाल्यानंतर हरयाणा आणि पंजाब सरकारला या प्रकरणात त्वरित कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली होती.

डब्ल्यूएचओने माहिती दिली आहे की, पंजाबची क्यूपी फार्माकेम लिमिटेड कंपनी या कफ सिरपचे उत्पादन करते. कंपनीने इतर देशांमध्ये वितरणासाठी हरयाणा इथल्या ट्रिलियम फार्मा नावाच्या कंपनीशी करार केला आहे. डब्ल्यूएचओने सर्व सदस्य देशांना हे कफ सिरप वापरु नये, असे आवाहन केले आहे. या दोन्ही कंपन्यांनी कप सिरपच्या सुरक्षितता आणि गुणवत्ता याबाबत कोणतीही हमी दिलेली नाही, असे डब्लूएचओचे म्हणणे आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.