पठाणच्या ‘बेशरम रंग’ गाण्याने सध्या चांगलाच धुमाकुळ घातलाय. दीपिकाने भगवा रंगाची बिकीनी घातल्याने गदारोळ झाला आहे. काही लोक प्रचंड विरोध करताना दिसत आहेत, तर काही समर्थनही करत आहेत. सिंघम फेम अभिनेते प्रकाश राज यांनीही या वादात उडी घेतली आहे. भगवा परिधान केलेले बलात्कारी स्वामी कसे चालतात असा प्रश्न उपस्थित केला आहे.
‘बेशरम रंग’ गाण्यातील दीपिकाच्या भगवा रंगाच्या बिकीनीवरुन आक्षेप घेतला जात असतानाच काहींनीन याचे समर्थनही केले आहे. प्रकाश राज यांनी या वादात उडी घेत काही प्रश्न टिव्ट केले आहेत. प्रकाश राज म्हणतात, ‘हॅशटॅग बेशरम, भगवा परिधान केलेले बलात्कारी पुरुषाचा सन्मान करतात, भगवा घालून आमदार द्वेषपूर्ण भाषण करतात, दलाली करतात, भगवा परिधान केलेले स्वामी अल्पवयीन मुलांवर अत्याचार करतात तेव्हा तुम्हाला तो भगवा गैर वाटत नाही पण सिनेमातील एक भगवा रंगाचा ड्रेस गैर वाटतो. ‘
अयोध्येतील महंत राजू दास यांनी ‘पठाण’वर बहिष्काराची मागणी केली आहे. इतकंच नाही, तर पठाण चित्रपट ज्या ज्या सिनेमागृहांमध्ये लावला जाईल ते जाळून टाकण्याचंही आवाहन महंत राजू दास यांनी केलं आहे. शाहरुख खाननं सनातन धर्माची खिल्ली उडवल्याचा आरोप राजू दास यांनी केला आहे. यावरुनही प्रकाश राज यांनी आक्षेप घेतला आहे.