सोलापूर |
सोलापूर शहर काँग्रेस कमिटी वतीने पोलादी पुरुष, देशाचे माजी गृहमंत्री, उपपंतप्रधान, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त काँग्रेस भवन सोलापूर येथे त्यांच्या प्रतिमेस सोलापूर अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी बोलताना चेतन नरोटे म्हणाले की, सरदार वल्लभभाई पटेल यांचे भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांचे योगदान खूप महत्वाचे आहे. आपले संपूर्ण जीवन हे देशासाठी समर्पित करणारे असे व्यक्ती म्हणजे सरदार पटेल आहे. ते स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री होते, स्वतंत्र भारताचे उपपंतप्रधान आणि स्वातंत्र्य सैनिक होते. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जवळपास 500 संस्थानांना देशात विलीन केले. त्यांच्या अविश्वसनीय व अद्भुत कुटनितिक कौशल्य व दृढतेमुळे त्यांना “लोहपुरूष” असे म्हंटल्या जाते.
यावेळी महिला अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर, देवाभाऊ गायकवाड, सुनील रसाळे, मा. नगरसेवक विनोद भोसले, डॉ. अप्पासाहेब बगले, तिरुपती परकीपंडला, चक्रपाणी गज्जम, नूर अहमद नालवार, लतीफ शेख, चंद्रकांत टिक्के, राजेश झंपले, श्रीकांत दासरी, प्रमिला तुपलवंडे, श्रीकांत येळेगावकर, VD गायकवाड, मुमताज तांबोळी, हाजी मेहमूद शेख, सायमन गट्टू, सोमनाथ व्हटकर, आनंद जमदाडे, दशरथ कड़के, चंदा काळे, यांच्यासह इतर काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.