Latest Marathi News

BREAKING NEWS

बऱ्याच वर्षाने वर्गमित्र भेटला, बिल गेट्सने आनंद महिंद्रांना दिलं खास गिफ्ट

0

महिंद्रा ग्रुपचे प्रमुख आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर चांगलेच सक्रीय असतात. तसेच वेगवेगळे विषयी आणि व्हिडिओ शेअर करत असतात. तसेच महत्वपूर्ण माहिती शेअर करत असतात. अनेकदा चाहत्यांना बक्षीसही देऊ करतात. त्यामुळेच, महिंद्रा यांचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्गही त्यांना नियमितपणे फॉलो करतो. आता, दोन दिवसांपूर्वी आनंद महिंद्रांनी मायक्रोसॉप्टचे संस्थापक बिग गेट्स यांच्यासमवेतचा फोटो शेअर केला आहे. या भेटीत दोन्ही उद्योगपतींनी मनसोक्त गप्पा मारल्या आणि पुढील काळात एकत्र येत काय करायचं, यासंदर्भातील योजनाही आखल्या आहेत.

बिल गेट्स हे आपल्या अधिकृत भारत दौऱ्यावर आले असून २८ फेब्रुवारी रोजी त्यांनी आनंद महिंद्रा यांची भेट घेतली. तत्पूर्वी आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांची मुंबईतील कार्यालयात भेट घेतली. त्यानंतर, आनंद महिंद्रांसोबत भेट झाली अन् विविध विषयांवर चर्चा झाली. स्वत: महिंद्रा यांनी ट्विटरवरुन फोटो शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे. आमच्या दोघांमध्ये सखोल चर्चा झाली असून कुठल्याही उद्योगासाठी आम्ही एकत्र येत नाही. तर, सामाजिक उत्तरदायित्व निभावण्यासाठी आपण कशारितीने काम करू, हीच चर्चा झाल्याचं महिंद्रा यांनी म्हटलं.

महिंद्रा यांनी गेट्स यांच्याकडून पुस्तक घेतानाचा फोटो आणि पुस्तकावर बिल गेट्स यांची सही असल्याचा फोटो शेअर केला आहे. महिंद्रा यांनी शेअर केलेल्या फोटोवर बिल गेट्स यांची सही असून आनंद महिंद्रा हे गेट्स यांचे वर्गमित्र असल्याचं त्यांनी म्हटलंय. To, Anand Best Wishes to my classmate असे शब्द लिहित गेट्स यांनी महिंद्रांना दिलेल्या पुस्तकावर सही केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.